Don't miss - 20% OFF! on brass decorative
Shivaji Maharaj Rajmudra Meaning and Relevance
शिवाजी महाराजांची राजमुद्रा अर्थ आणि प्रासंगिकता (Shivaji Maharaj Rajmudra Meaning and Relevance)
जगाच्या पाठीवर अनेक राजे महाराजे व राजसत्त्ता होऊन गेल्या तरी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणे योग्य एकही राजा सापडणे अशक्य आहे, म्हणूनूच छत्रपती शिवाजी महाराजांचे अधिकृत राजचिन्ह सुद्धा मोठया अभिनाने जगभरात आणि सम्मानाने पुजल्या आणि संग्रहीत करण्यात येते. आम्ही संशोधन करत असताना मिळालेल्या माहिती नुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दोन ते तीन प्रकारच्या मुद्रा त्यांच्या विशिष्ट्य उद्देशानुसार वापरात असल्याची माहिती मिळते परंतु प्रामुख्यने हि राजमुद्रा महाराजांची अधिकृत राजचिन्ह असल्याचं मान्यता बहुतांश इतिहासकर पण निर्विवाद पाने मान्य करतात. शिवाजी महाराजांची राजमुद्रा ज्याला आपण शिवमुद्रा म्हणून पण ओळखतो ती मात्र एकच आहे.
आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचे स्वरूप जरी कलात्मक दृष्टीने थोडेफार बदललेले आढळत असले तरी त्या वर मुद्रित श्लोक आणि त्याचा मूळ अर्थ जसा च्या तसाच आहे. आणि तो पण निर्वीवादीत.
आम्ही या ठिकाणी संदर्भासाठी बीबीसी मराठीवर स्वाती पाटील यांनी इतिहास संशोधक श्री इंद्रजीत सावंत यांच्या कडून मिळालेल्या माहिती आधारे एक लेख 19 फेब्रुवारी 2022 रोजी शिवजयंती च्या निम्मिताने प्रकाशित केला आहे
राजमुद्रेवर कोरलेल्या श्लोक कोणता व त्यातील मजकुराचा अर्थ काय?
राजमुद्रेवर कोरलेले श्लोक
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदीता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
मराठी मध्ये अर्थ
“प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.”
इंग्रजी मध्ये अर्थ
“The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji will grow like the first-day moon. It will be worshiped by the world & it will shine only for well-being of people.”
शिवाजी महाराजांच्या काळात जी राजमुद्रा होती, तीच राजमुद्रा आम्ही बनवतो असा आमचा दावा नाही. त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे हे प्रतिक देशाच्या प्रत्येक घराघरात पोहोचावे यासाठी लोकांच्या मनात रुजलेली राजमुद्रेची प्रतिमा खर्या श्रद्धा भक्तीभावाने साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे. विशेष करून सण २०२० पासून मोबिकॉम मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे आम्हाला अखंड पितळ धातु मध्ये बनलेल्या राजमुद्रेला पूर्ण भारतातातून प्रचंड दाद मिळत आहे. यामुळॆच आम्ही अभिमानाने सांगतो कि छत्रपतींच्या राजमुद्रेचे निर्माता आहोत, परंतु सत्य हे आहे कि ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली त्यांची राजमुद्रा बनवण्याची क्षमता आज कुणाकडेच नाही आम्ही फक्त त्याची नक्कल निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहोत.
मोबिकॉम मॉल, छत्रपती संभाजीनगर द्वारा निर्मित धातूंच्या राजमुद्रा (Different type of Rajmudra Manufactured by Mobicom Mall)
संदर्भ:- बीबीसी मराठी (BBC Marathi)